शिखर विजयाचे

    दिनांक  10-Jun-2019


 

 

जगातील तेजतर्रार गोलंदाज, गरुडासारकी सावजावर झेप घेणारे क्षेत्ररक्षक आणि दडपण जुगारून विजय खेचून आणणारे बॅट्समन ही ऑस्ट्रेलियाची आजवरची ओळख. पण भारतानं या वर्ल्डकपध्ये ऑस्ट्रेलियाच्या या ओळखीचा पुरता धुव्वा उडवला. अमिताभचा नमक हराम सिनेमात एक डायलॉग आहे. ‘है किसी मां के लाल में हिम्मत, जो मेरे सामने आए...’ या विजयानं भारतानं यंदाच्या वर्ल्डकपमध्ये सहभागी सगळ्या टीमना जणू हा इशाराचं दिलाय.

 

भारतानं क्रिकेट वर्ल्डकपच्या लीगमॅचमध्ये विद्यमान विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाचा ३६ रन्सनं सहज पराभव केला. या दोन ओळीत भारताच्या विजयाचं वर्णन करणं म्हणजे भारतीय खेळाडूंच्या विजयाचे श्रेय हिरावून घेण्यासारखे असेल. ऑस्ट्रेलियातील मेलबॉर्नवर गेल्या वर्लडकपमध्ये भारतानं सेमी फायनलमध्ये यजमान ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करला होता. मी त्या मॅचचा साक्षिदार होतो. त्यावेळी स्टीव्ह स्मिथच्या घणाघाती सेंच्युरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं सव्वा तीनशेच्या पार धावा उभारल्या होत्या. आणि भारताचं अवसानच गळाले होते. आज नेमकं उलटं झालं, शिखर धवनच्या सेंच्युरीच्या जोरावर भारातनं साडेतीनशेपार धावांचा डोंगर रचला आणि भुवनेश्वर आणि भूमारच्या तुफानी माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियालाची पुरती दमछाक उडाली. या विजयाचं महत्व म्हणजे वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुध्द तीनशेपार धावा प्रतिस्पर्धी संघानी उभारण्याची ही केवळ दुसरीच वेळ आहे. यावरून भारताच्या पराक्रमाची उंची लक्षात येईल. यापुर्वी श्रीलंकेनं वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाच्या ३७६ धावांचा अयशस्वी पाठलाग करताना ३१२ रन्स केले होते. जगातील तेजतर्रार गोलंदाज, गरुडासारकी सावजावर झेप घेणारे क्षेत्ररक्षक आणि दडपण जुगारून विजय खेचून आणणारे बॅट्समन ही ऑस्ट्रेलियाची आजवरची ओळख. पण भारतानं या वर्ल्डकपध्ये ऑस्ट्रेलियाच्या या ओळखीचा पुरता धुव्वा उडवला. अमिताभचा नमक हराम सिनेमात एक डायलॉग आहे. है किसी मां के लाल में हिम्मत, जो मेरे सामने आए...’ या विजयानं भारतानं यंदाच्या वर्ल्डकपमध्ये सहभागी सगळ्या टीमना जणू हा इशाराचं दिलाय.

 

या विजयाचं वैशिष्ट्य म्हणजे पहिल्या दोन मॅचमध्ये भारतानं ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकी अशा दोन बलाढ्य टीमना त्यांच्या प्रतिष्ठेसह धुळीस मिळवलंय. दक्षिण आफ्रिकेविरुध्द रोहीत शर्मानं सेंच्युरी ठोकली तर ऑस्ट्रेलियाविरुध्द शिखर धवननं. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत झालेल्या मॅचमध्ये कोणत्याही देशाच्या दोन्ही सलामीवीरांनी सेंच्युरी ठोकलेली नाही. शिखर धवनची बॅटींग म्हणजे बॉलर्सवर अत्याचार असतो. अगदी निर्दयी पद्धतीनं तो बॉलर्सची कत्तल करतो. फास्ट, स्पिनर असा त्याच्याकडे भेदभाव नसतो. आपल्या दिशेनं आलेला प्रत्येक बॉल हाणलाच पाहिजे या श्रध्देनं तो गदा फिरवावी तशी बॅट घुमवत असतो. आणि त्यात जर मॅच लंडनच्या ओव्हल मैदानावर असेल तर मग बॉलर्सचा खेळ खल्लास. याच ओव्हलवर त्याचं गेल्या पाच इनिंगमधिल हे तिसरं शतक आहे. या ओव्हल मैदानावरील गेल्या पाच डावात त्यानं नाबाद १०२, १२५, ७८, २१ आणि ११७ अशी धावांची बरसात केलीय.

 

एकीकडे बॅट्समन जोरात असताना भारतीय बॉलर्सनेही ऑस्ट्रेलियाला ऑलआऊट करून ‘हम भी कुछ कमी नही’ हे दाखवून दिलेय. विशेषता साडेतीनशेचा पाठलाग करत असताना भारताच्या भुवनेश्वरनं पहिल्या पाच ओव्हरमध्ये फक्त १२ रन्स देत ऑस्ट्रेलियाच्या घोडदौडीला जो ब्रेक लावला तो स्वप्नवत होता.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat