वर्षाला 'इतकी' रक्कम काढल्यास भरावा लागणार टॅक्स

    दिनांक  10-Jun-2019


 


नवी दिल्ली : वर्षाला १० लाखपेक्षा अधिक रक्कम रोख काढल्यास त्यावर कर लादण्याच्या प्रस्तावावर सध्या केंद्र सरकार विचार करत आहे. डिजिटल व्यवहाराला चालना मिळावी यासाठी केंद्र सरकार हे पाऊल उचलत असल्याचे सांगितले जात आहे. व्यवहारातील नोटांचा वापर कमी करून काळ्या पैशाला आळा घालावा याही उद्देशाने सरकार हा निर्णय घेण्याचा शक्यता आहे.

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोठी रक्कम काढताना आधार प्रमाणीकरण अनिवार्य करण्याचा प्रस्तावही सरकारच्या विचाराधीन आहे. आधार प्रमाणीकरणामुळे मोठ्या रकमा वितरित करणाऱ्या लोकांची ओळख पडण्यास मदत होईल. तसेच, कर परताव्याबाबतचे कामही सोपे होईल. सध्या ५० हजारांपेक्षा जास्त रक्कम बँक खात्यात टाकताना किंवा काढताना पॅनकार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. याशिवाय, आधार कार्डाचा दुरुपयोग होऊ नये यासाठी युआयडी प्रमाणीकरण आणि ओटीपीचा वापर करण्यात येईल.

 

येत्या अर्थसंकल्पामध्ये याविषयी तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. तरीही, अजूनही याबाबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. यामुळे, सामान्य तसेच गरीब ग्राहकांच्या कदाचित भर पडू शकते असे मत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केले. त्यामुळे केंद्र सरकारकडून याचा सारासार विचार करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat