शारदा मंदिर शाळेची आर्या बेलवलकर मुंबईत दुसऱ्या क्रमांकावर

    दिनांक  10-Jun-2019मुंबई : दक्षिण मुंबईच्या गावदेवी येथील शारदा मंदिर हायस्कूलची विद्यार्थिनी आर्या बेलवलकर हिने माध्यमिक बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत ९८.८० टक्के गुण मिळवत मुंबईच्या टॉपर्समध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे. लोढा फाऊंडेशन मार्फत संचालित केल्या जाणाऱ्या शारदा मंदिर शाळेचा निकाल यावर्षीही १०० टक्के लागला आहे. शाळेतील सर्व ४१ विद्यार्थी सेकंडरी बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. यामधील ३२ विद्यार्थी डिस्टिंक्शनमध्ये उत्तीर्ण झाले असून ७ प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत.

 

माध्यमिक शिक्षा बोर्डाच्या परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला. या निकालात शारदा मंदिर शाळेच्या विद्यार्थिनी आर्या बेलवलकर हिने ९८.८०, तनिषा भट्ट हिने ९७.२०, अरुशी गडा हिने ९५२०, रितुराज चांदगुडे याने ९२.८०, मनस्वी कामदार हिने ९२.६०, मनीषा आमीन हिने ९२.८० आणि जैनिल कडकिया हिने ९१.६० टक्के गुण मिळवत उत्तीर्ण झाले. लोढा फाऊंडेशनच्या अध्यक्षा मंजु लोढा यांनी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींना चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याने त्यांचे अभिनंदन केले. त्या म्हणाल्या की, “पुढे वाढण्याची व जिंकण्याची इच्छा व यशस्वी होण्यासाठीचे प्रयत्न, आपल्या क्षमता पर्यंत पोहोचण्याची ती किल्ली आहे जी उत्कृष्टतेचे दार उघडते.” मंजु लोढा पुढे म्हणाल्या की, “शारदा मंदिर शाळा आपल्या विद्यार्थ्यांमध्ये असेच वातावरण निर्माण करत आहे, जिथे विद्यार्थी जिंकण्याची आपली इच्छा पूर्ण करू शकतील.”

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat