सोनिया गांधी काँग्रेसच्या संसदीय दल नेतेपदी कायम

    दिनांक  01-Jun-2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांमध्ये मानहानीकारक परभावनांतर काँग्रेसच्या संसदीय दलाची आज बैठक पार पडली. या बैठकीमध्ये काँग्रेसच्या संसदीय दलाच्या नेतेपदी सोनिया गांधी कायम राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात काँग्रेसच्या संसदीय दलाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यासाठी देशभरातून निवडणून आलेले ५२ खासदार उपस्थित होते.

 

आजच्या काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीत लोकसभेतील पक्षाच्या रणनितीवर चर्चा करण्यात आली. यावेळी सोनिया गांधी, राहुल गांधी, मनमोहन सिंह व काँग्रेसचे महत्वाचे नेते उपस्थित होते. यावेळी सोनिया गांधी यांनी मतदार आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले. काँग्रेसचे ५२ खासदारच भाजपाविरोधात इंच इंच लढवण्यासाठी पुरेसे असल्याचे सांगत राहुल गांधी यांनी नवनिर्वाचित खासदारांना मार्गदर्शन केले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat