पराग कान्‍हेरेने टीमचा रोष पत्करून दिली सुरेखा पुणेकरला साथ

    01-Jun-2019
Total Views |


 

'बिग बॉस मराठीमधील टास्‍क्‍स अगदी जोमात आहेत. असे वाटते की, स्‍पर्धकांनी गटबाजी रण्‍यास सुरूवात केली आहे. या सीजनच्‍या पहिल्‍या टास्‍कसाठी घरातील सदस्‍यांना दोन टीम्‍समध्‍ये विभागण्‍यात आले. एका टीमचे नेतृत्‍व अभिजीत बिचुकले आणि दुस-या टीमचे नेतृत्‍व वैशाली माडेकडे सोपवण्‍यात आले. पराग कान्‍हेरे व माधव देवचके हे किशोरी शहाणे विज, अभिजीत केळकर, विद्याधर जोशी आणि सुरेखा पुणेकर यांनी सादर केलेल्‍या क्रॉस-ड्रेसिंग टास्‍कबाबत चर्चा करताना दिसले आहेत.

 

शेफ परागला मुद्दाम सुरेखाला शोभा न देणारे कपडे घालायला सांगितलेल्‍या त्‍याच्‍या टीममधील सदस्‍यांचा खूप राग येतो. माधव सुरेखाची बाजू घेतो. तसेच असे करण्‍याची कोणाची योजना होती हे देखील जाणून घेण्यासाठी उत्‍सुक असतो. पराग त्‍याची बाजू मांडत म्‍हणतो, ''मला यांच्‍या इज्‍जतीची काळजी आहे. ही लोकं कलावंत आहेत!'' सुरेखा मान्‍य करत प्रतिसाद देते आणि म्‍हणते, ''माझी तर वाटच लागली सगळी.'' या दरम्‍यान पराग पुढे येत म्‍हणतो, ''माझे काही प्रिन्सिपल्‍स आहेत आयुष्‍यामध्‍ये, ती प्रिन्सिपल्‍स मी जपली.'' तर बिचुकले या सर्व मतांना मान हलवत होकार दर्शवतो.

 

यामुळे प्रभावित झालेला माधव परागच्‍या मताची प्रशंसा करतो. ते दोघेही इतर स्‍पर्धकांना (मुलींना) प्रश्‍न विचारायला जातात. पराग म्‍हणतो, ''त्‍या २२-२३ वर्षांच्‍या मुली आहेत, त्‍यांना काय कळणार'' कारण त्‍या सुरेखाची अस्‍वस्‍थता जाणण्‍यामध्‍ये असमर्थ ठरतात. या स्‍पर्धकांमधील चढाओढ ५ व्‍या दिवशीही सुरूच आहे. त्‍यांच्‍यामधील क्षुल्‍लक भांडणांचे सत्र देखील असेच सुरु राहणार असे दिसते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat