सर्वांची लाडकी लालपरी झाली ७१ वर्षांची

01 Jun 2019 15:38:02

 


मुंबई : राज्यातील खेड्यापाड्यांतून, गावागावांतून विहार करणारी लालपरी आता ७१ वर्षांची झाली. या लालपरीचा म्हणजेच एसटीचा ७१ वा वर्धापन दिन आज राज्यातील सर्व एसटी आगार आणि कार्यालयांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. एसटीने लालपरी पासून सुरु केलेला प्रवास हिरकणी, शिवनेरी, शिवशाही ते विठाई असा सुखद टप्प्यावर येऊन ठेपला आहे.

 

राज्यातील कोट्यवधी प्रवाशांची लोकवाहिनी ठरलेल्या लालपरी म्हणजे एसटीने काळानुसार कात टाकली असून अनेक स्वागतार्ह बदलही केले आहेत. एसटी म्हणजे केवळ प्रवाशांची वाहतूक करणारी यंत्रणा एवढेच मर्यादित नसून एसटीने सातत्याने सामाजिक बांधिलकी जपली आहे.

 

राज्यावर आलेल्या दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीत एसटीने नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे. मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात राहता यावे यासाठी एसटीने पुढाकार घेत प्रवासात सवलती दिल्या आहेत. यासोबतच अबाल वृद्धांच्या सेवेतही तिने नेहमीच पुढाकार घेतला आहे. अशा या लाडक्या एसटीला वर्धापनदिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0