अमित शहा यांनी स्वीकारला गृहमंत्रालयाचा पदभार

    दिनांक  01-Jun-2019


 


नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांची पुन्हा सत्ता आल्यानंतर गुरुवारी शपथविधी पार पडला. तर, शुक्रवारी खातेवाटप करण्यात आले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना गृहमंत्रीपद देण्यात आले आहे. शनिवारी अमित शहा यांनी राजनाथ सिंह यांच्याकडून गृहमंत्रालयाचा पदभार स्वीकारला.

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा समावेश 'कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी'मध्ये करण्यात येणार आहे. त्यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, रराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालदेखील असणार आहेत. गृहमंत्री पदाचा भार स्वीकारल्यानंतर अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा, तसेच ३७० कलम रद्द करण्याचा मुद्दा असे अनेक आव्हाने त्यांच्यासमोर आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat