पुण्यात दुकानाला आग : पाच मृत्युमुखी

    दिनांक  09-May-2019

 


पुणे : पुण्यात देवाची ऊरळी येथील राजयोग साडी सेंटर दुकानाला लागलेल्या आगीत पाच कामगारांचा मृत्यू झाला आहे. आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले असून आता कुलिंग ऑपरेशन सुरू आहे. गुरुवारी पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास दुकानाला आग लागली.

 

या दुर्घटनेत पाच कामगारांचा मृत्यू झाला आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या आणि १० खासगी टँकर घटनास्थळी दाखल झाले. दुकानात एकूण पाच कामगार होते. धुरामध्ये होरपळून त्यांचा मृत्यू झाला.

 
 
 

आगीमध्ये मोठया वित्तहानीही झाली आहे. हे संपूर्ण दुकान या आगीत जळून खाक झाले आहे. आगीमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांपैकी चार जण परराज्यातील होते. देवाची ऊरळी येथे अनेक साडयांची दुकाने आहेत. पहाटेच्या सुमारास राजयोग साडी सेंटर दुकानात आग भडकली. दरम्यान, आग कशामुळे लागली याबद्दल तपास सुरू आहे. राकेश चौधरी (२४), राकेश मेघवाल (२०), धर्माराम बडियासर (२४), सूरज शर्मा (२५), गोपाल चांडक (२३), अशी मृतांची नावे आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat