कुकडे दाम्पत्याचा हृद्य सत्कार

    दिनांक  09-May-2019
मुंबई : केशवसृष्टी आणि डॉ. अशोकराव कुकडे मित्रपरिवार लातूर, यांच्या वतीने डॉ. अशोकराव कुकडे आणि डॉ. ज्योत्स्ना कुकडे यांचा सत्कार ११ मे रोजी मुंबईत होणार आहे. डॉ. अशोकराव कुकडे यांना भारत सरकारने ‘पद्मभूषण’ या पुरस्काराने सन्मानित केले आहे, तसेच एसएनडीटी विद्यापीठाने डॉ. ज्योत्स्ना कुकडे यांना डी. लिट या सन्माननीय पदवीने अलंकृत केले आहे.

 

कुकडे दाम्पत्याचा हृद्य सत्कार ११ मे रोजी, सायंकाळी ५.३० ते ८ या वेळेत माहेश्वरी भवन, श्रीजी रेस्टारंटच्या समोर, ओशिवरा पोलीस स्टेशनच्या जवळ, अंधेरी (पश्चिम) महाराष्ट्रभूषण डॉ. अभय बंग आणि राणी बंग यांच्या विशेष उपस्थितीत संपन्न होणार आहे. सभागृहाची आसनसंख्या मर्यादित असल्यामुळे, ज्यांना निमंत्रण मिळाले नसेल, परंतु कार्यक्रमात सहभागी होण्याची इच्छा असेल त्यांनी बिमल केडिया (9820148916) यांच्याशी संपर्क करावा.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat