कुर्ल्यात कचऱ्याचा ढीग घरावर कोसळला

08 May 2019 16:35:54



मुंबई : कुर्ल्यामध्ये टेकडीवरील कचऱ्याचा ढीग पायथ्याशी असलेल्या घरावर कोसळला आहे. यामध्ये एका व्यक्तीचा त्याखाली दबून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली. कुर्ला पूर्वेकडील कुरेशी नगरमध्ये हा अपघात झाला. यामध्ये एक महिला जखमी झाल्याची माहिती आहे.

 

झोपडपट्टीतील रहिवासी काही महिन्यांपासून टेकडीवर कचरा आणि भंगार टाकत आहेत. या टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या घरावर बुधवारी कचऱ्याचा ढीग कोसळला. त्याखाली ४८ वर्षीय अब्दुल रशिद कुरेशी आणि एक ६५ वर्षीय महिला दबली. त्या दोघांनाही काही वेळाने बाहेर काढण्यात आले. अशी माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0