सेक्रेड गेम्स सिझन २ - नवीन खुलासा

07 May 2019 13:35:20



 

सेक्रेड गेम्स सिझन १ च्या प्रचंड यशानंतर आता सेक्रेड गेम्स सिझन २ लवकरच प्रदर्शित होणार आहे. सरताज सिंह म्हणजेच सैफ अली खान आणि गणेश गायतोंडे म्हणजेच समीक्षकांकडून स्तुती लाभलेला अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्यातील संवाद आता पुढच्या वळणावर जाणार आहे आणि यामध्ये भर पडणार आहे पंकज त्रिपाठी म्हणजे गुरुजी या नवीन पात्राची. आता हा कथेतील ट्विस्ट नक्की काय आहे हे लवकरच कळेल.


 
 

पंकज त्रिपाठी यांच्याबरोबरच कल्की कोचीन आणि रणवीर शौरी या आणखी दोन नवीन पात्रांना आपल्याला पाहायला मिळणार आहे. सेक्रेड गेम ही कथा विक्रम चंद्र यांच्या सेक्रेड गेम या पुस्तकावर आधारित आहे.

 

आता आगामी सीझनचे काय वेगळेपण असणारे? कोण कोणावर बाजी मारणार? सरताजला कोणत्या संकटांचा सामना करावा लागणार हे सगळे प्रश्न प्रेक्षकांच्या मनात आहेत. त्याची उत्तरे जाणून घेण्याची संधी आता लवकरच सर्वांना मिळेल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
 
Powered By Sangraha 9.0