‘पुष्कर शो THREE’ तर्फे संस्थाना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत

07 May 2019 17:36:46



मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते पुष्कर श्रोत्री यांनी नुकतेच वयाच्या ५० व्या वर्षात पदार्पण केले. तसेच त्यांच्या कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण झाली या निमित्त सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून त्यांनी पुष्कर शो THREE’ या विशेष उपक्रमाचे आयोजन केले. यामध्ये रविवारी तीन नाटकांच्या प्रयोगातून तीन सामाजिक संस्थाना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. या उपक्रमाला नाट्य रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तसेच याप्रसंगी सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

 

दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले येथे संपन्न झालेल्या पुष्कर शो THREE’ या विशेष कार्यक्रमात आम्ही आणि आमचे बाप’, ‘अ परफेक्ट मर्डर’, ‘हसवा फसवीया तीन नाटकांचे प्रयोग पार पडले, यावेळी सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी प्रत्येक संस्थेला या नाट्य प्रयोगाच्या माध्यमातून प्रत्येकी दीड लाख रुपये आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, आमदार आणि वकील आशिष शेलार आणि आमदार आणि वकील पराग अळवणी यांनी प्रत्येकी ५० हजार रुपये अशी एकूण २ लाख रुपयांची मदत प्रत्येक संस्थेला करण्यात आली.

पुष्कर शो THREE’ या उपक्रमांतर्गत आदी कल्चरटेन्मेंट निर्मित आम्ही आणि आमचे बापया प्रयोगाचे उत्पन्न ठाण्यातील सिग्नल शाळासंस्थेला देण्यात आले, बदाम राजा निर्मित अ परफेक्ट मर्डरया प्रयोगाचे उत्पन्न कोल्हापुरातल्या चेतनासंस्थेला तर जिगिषा-अष्टविनायक निर्मित दिलीप प्रभावळकर लिखित व चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित हसवा-फसवीच्या प्रयोगाचे उत्पन्न अभिनेत्री विशाखा सुभेदार यांच्या संकल्पनेतून कर्जत येथे उभ्या राहणाऱ्या कलाश्रयया वृद्धाश्रमाच्या स्थापनेसाठी देण्यात आले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
Powered By Sangraha 9.0