दुर्गावाहिनी शौर्य प्रशिक्षण शिबीर

    दिनांक  07-May-2019


मुंबई : विश्वहिंदू परिषदेच्या कोकण प्रांताच्या अंतर्गत दुर्गावाहिनीच्यावतीने २६ मे ते २ जून, २०१९ या कालावधीत व्यक्तिमत्त्व विकास, शौर्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कांदिवली येथील इंडियन एज्युकेशन शाळेत आयोजित करण्यात येणार्‍या या प्रशिक्षणामध्ये वय वर्षे १५ ते ३५ या वयोगटातील तरुणी सहभागी होऊ शकतात.

 

दुर्गावाहिनीच्यावतीने दरवर्षी अशा शिबिराचे आयोजन केले जाते. या शिबिरामधून हजारो तरुणींनी व्यक्तिमत्त्व विकासाचे आणि स्वरक्षणाचे धडे घेतले आहेत. या वर्षीच्या शिबिरामध्ये योगासने, स्वरक्षणाचे तंत्र आणि मंत्र, रायफल शुटिंग, रॅपलिंग, व्हॅली क्रॉसिंग यासारख्या शारीरिक कार्यक्रमाबरोबरच हिंदू संस्कृती, लव्ह जिहाद, युवतींचे सक्षमीकरण, धर्मांतरण आदी विषयांवर परिसवांद आणि गटचर्चांचेही आयोजन करण्यात येणार आहे. हे शिबीर निवासी आहे. देव, देश आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी कार्य करणार्‍या दुर्गावाहिनीच्या शिबिरात सहभागी होण्यासाठी ८४२२९४६५४२ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन परिषदेचे सहमंत्री आणि शिबिराचे संयोजक मोहन सालेकर यांनी केले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat