दुर्गमित्रांनी केली परशुराम कुंडाची साफसफाई

    दिनांक  07-May-2019पालघर : समुद्रसपाटीपासून २००० फूट उंचीवरील ऐतिहासिक तुंगारेश्वर पर्वतावरील परशुराम कुंडाची आज साफसफाई करण्यात आली. भगवान परशुराम यांच्या जयंतीनिम्मित किल्ले वसई मोहीम परिवाराच्या दुर्गमित्रांनी भर उन्हात या कुंडाची सफाई केली. गेली अनेक वर्षे माती, दगड, पर्यटक कचरा इत्यादी गाळामुळे या परशुराम कुंडातील पाणी पिण्यायोग्य राहिलेले नव्हते. या साफसफाईमुळे आता येथे येणाऱ्या भाविकांना व दुर्गमित्रांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.

 

 
 

मुंबई, वसई, मालाड व राईगाव येथून आलेल्या १५ दुर्गमित्रांनी तुंगार गडाच्या वास्तुदेवतेचे पूजन करून कुंडांची स्वच्छता केली. यामध्ये कुंडाचे खांब टाके क्रमांक १ व छप्पर टाके क्रमांक ४ या दोन मोठ्या क्षमतेच्या कुंडांची पूर्ण स्वच्छता करण्यात आली. या कुंडांतील दगड माती व अस्वच्छ पाणी काढून टाकण्यात आले. दरम्यान, किल्ले वसई मोहीमेचे इतिहास अभ्यासक श्रीदत्त राऊत यांनी दुर्गमित्रांना मार्गदर्शन केले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat