'सीआयएससीई' परीक्षांचे निकाल जाहीर

07 May 2019 18:13:47



नवी दिल्ली : 'सीबीएसई' दहावीच्या निकालानंतर आज काऊन्सिल फॉर दि इंडिअन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनचा (सीआयएससीई) दहावी आणि बारावी निकाल जाहीर झाला आहे. या निकालात यंदाही मुलींनीच बाजी मारल्याचे पाहायला मिळाले असून मुंबईच्या जुही कजारिया व मुक्तसरच्या मनहर बन्सल यांनी दहावीच्या परीक्षेत बाजी मारली आहे. तर देवांग कुमार अग्रवाल आणि विभा स्वामिनाथन यांनी बारावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत बाजी मारली आहे.

 

आयसीएसई म्हणजे दहावीच्या परिक्षेत ९८.५४ टक्के विद्यार्थी तर आयएससीत म्हणजे बारावीच्या परीक्षेत ९६.५२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुंबईच्या जुही रुपेश कजारिया व मुक्तसरच्या मनहर बन्सल यांनी दहावीच्या परीक्षेत ९९.६० टक्के गुण मिळवत देशात पहिले आले आहेत. तर सीआयएससीईच्या इतिहासात देवांग कुमार अग्रवाल आणि विभा स्वामिनाथन यांनी बारावीच्या परीक्षेत प्रथमच १०० टक्के गुण मिळवले आहेत.

 

तर दुसरीकडे दहावीच्या परीक्षेत मुंबईच्या फोरम संजनवाला, अनुश्री चौधरी, अनुष्का अग्निहोत्री आणि ठाण्याचा यश भन्साळीने ९९.४० टक्के गुण मिळवत देशात दुसरा क्रमांक पटकावला आहे. दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांनी सीआयएससीईची परीक्षा दिली होती ते cisce.org या संकेतस्थळावर आपला निकाल पाहू शकणार आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0