'आयएनएस वेला'चे जलावतरण ; नौदलाची ताकद वाढणार

    दिनांक  06-May-2019


 


मुंबई : भारतीय नौदलाच्या 'प्रोजेक्ट ७५' अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या स्कॉर्पियन श्रेणीच्या ६ पाणबुड्यांपैकी 'आयएनएस वेला' या चौथ्या पाणबुडीच सोमवारी मुंबईतील माझगाव डॉक येथे जलावतरण करण्यात आले. संरक्षण उत्पादन सचिव डॉ. अजय कुमार यांच्या पत्नी वीणा अजय कुमार यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला.

 

माझगांव डॉक शिपबिल्डर्सने भारतीय नौदलासाठी ही पाणबुडी बांधली आहे. भारतीय नौदलात ही पाणबुडी समाविष्ट करण्यापूर्वी बंदरात आणि समुद्रातही या पाणबुडीच्या कठोर चाचण्या घेण्यात येतील. या पाणबुडीवर अत्याधुनिक शस्त्रे जोडण्यात आली असून आता या पाणबुडीच्या नौदलाकडून शेकडो टेस्ट घेण्यात येणार आहेत.

 

स्कॉर्पिन श्रेणीतल्या सहा पाणबुड्या बांधण्यासाठी आणि तंत्रज्ञान हस्तांतरणासाठी फ्रान्समधल्या नेव्हल ग्रुपशी करार झाला आहे. माझगांव गोदीत सध्या आठ युद्ध नौका आणि पाच पाणबुड्या बांधण्याचे काम सुरु आहे. माझगाव डॉकमध्ये फ्रांसच्या डिसीएनएस व माझगाव डॉक यांच्या माध्यमातून २००५ ला करण्यात आलेल्या करारानुसार 'प्रोजेक्ट ७५ च्या अंतर्गत सहा पाणबुड्या बांधल्या जात आहेत. त्यापैकी 'आयएनएस वेला' ही पाणबुडी बांधण्यात आली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat