यूपीएच्या काळात सर्जिकल स्ट्राईक नाही तर लष्करी कारवाई?

04 May 2019 18:22:36



निवृत्त लेफ्टनंट जनरल डी. एस. हुड्डा यांनी सोडले मौन


नवी दिल्ली : यूपीए सरकारच्या काळात सहा सर्जिकल स्ट्राईक केल्याचा दावा काँग्रेसने केला होता. यावरून देशभरातून काँग्रेसची खिल्ली उडवण्यात आली. मात्र, आता निवृत्त लेफ्टनंट जनरल डी. एस. हुड्डा यांनी काँग्रेसच्या दाव्यावर मौन सोडले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी काँग्रेसने केलेल्या दाव्याला सर्जिकल स्ट्राईक म्हणता येईल का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

 

हुड्डा म्हणाले, यूपीए सरकारच्या काळात झालेल्या कारवाईला सर्जिकल स्ट्राईक म्हणू शकता किंवा सीमा भागात लष्कराकडून नेहमी केली जाते तशी कारवाई म्हणू शकता. काँग्रेसने केलेल्या दाव्याच्या तारखा आणि ठिकाणे मला फारशी आठवत नाहीत. त्यामुळे हुड्डा यांच्या या विधानाने काँग्रेस सरकारने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा दावा फोल ठरताना दिसतो आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0