आमच्या संस्कृतीवर वाकडी नजर केलीत तर डोळे बाहेर काढू

    दिनांक  04-May-2019करणी सेनेचे जीवन सिंह सोलंकींची जावेद अख्तर यांना धमकी


मुंबई : मुस्लिम महिलांच्या बुरख्यासोबतच राजस्थानातील घुंगटप्रथेवरही बंदी घालावी या वादग्रस्त वक्तव्यानंतर गीतकार जावेद अख्तर यांना करणी सेनेनी धमकी दिली आहे. महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख जीवन सिंह सोलंकी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत अख्तर यांना धमकी दिली. ४५ सेकंदाचा हा व्हिडिओ असून यात तीन दिवसांत माफी मागा, अन्यथा तुम्हाला तुमच्या घरात घुसून मारू, अशी धमकी दिली आहे.

 

श्रीलंकेपाठोपाठ भारतातही बुरखाबंदी करावी का? या प्रश्नावर उत्तर देताना जावेद अख्तर यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी बुरख्यावरच नाही तर राजस्थानातील घुंगटप्रथेवरही बंदी घालावी असे सांगितले होते. यातर ते येवढयावरच थांबले नाही तर येत्या ६ मेच्या मतदानाच्या आधी सरकारने ही अंबलबजावणी करावी, असे आव्हान त्यांनी सरकारला केले होते. यानंतर अनेक स्तरातून प्रतिक्रिया आल्या होत्या मात्र करणी सेनेने आपली भूमिका जाहीर केली नव्हती. अखेर काल एक व्हिडिओ पोस्ट करत जीवन सिंह सोलंकी यांनी अख्तर यांना धमकी दिली आहे.

 

"जावेद अख्तर तुम्ही तुमची मर्यादा ओळखा, राजस्थानच्या संस्कृतीवर बोट करू करून करणी सेनेला खवळू नका. येत्या तीन दिवसात तुमच्या या वक्तव्यावर माफी मागा अन्यथा करणी सेनेचा विरोध स्वीकारायला तयार राहा. राजस्थानच्या संस्कृतीवर कोणी वाकडी नजर केली तर आम्ही त्यांचे आम्ही डोळे बाहेर काढू. तुम्हाला माहिती नसेल तर संजय लीला भन्साळी यांना विचारा करणी सेना कशा प्रकारे उत्तर देते. त्यामुळे येत्या तीन दिवसांत माफी मागा, अन्यथा तुम्हाला तुमच्या घरात घुसून मारू." असे या व्हिडिओमध्ये जीवन सिंह सोलंकी म्हणाले. त्यामुळे आता जावेद अख्तर माफी मागतात का? किंवा नवीन वादाला तोंड फोडतात हे पाहावे लागेल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat