विषबाधा झाल्याने १७ गायी,४ म्हशींचा मृत्यू

04 May 2019 16:26:04



नाशिक : दुष्काळाचे परिणाम माणसांसोबतच आता मुक्या प्राण्यांवरदेखील उमटून लागले आहेत. नाशिकमधील सिन्नर तालुक्यातील कोमलवाडी येथे कोवळी ज्वारीची ताटे खाल्ल्याने १७ गायी व ४ म्हशींना विषबाधा झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. पशुधन विकास अधिकारी डॉ. अविनाश पवार यांनी जनावरांच्या केलेल्या शवविच्छेदनातून ही माहिती समोर आली.

 

कोमलवाडी शिवारात काठेवाडी गवळी लोक जनावरांचा कळप घेऊन फिरत होते. या शिवारात एका शेतकऱ्याने ज्वारी कापून घेतली होती. मध्यंतरी आलेल्या अवकाळी पावसामुळे कापलेल्या ज्वारीला पुन्हा ताटे फुटली होती. या फिरस्ती गवळी लोकांनी त्यांच्या जनावरांना ज्वारीत चारा खाऊ घालण्यासाठी सोडले. कोवळया ज्वारीमुळे जनावरांना फेस येणे, चक्कर येणे सुरू झाले. त्यात १७ गायी व ४ म्हशींचा मृत्यू झाला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0