
मुंबई : एकतिसाव्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत ‘सोयरे सकळ’ या नाटकाने बाजी मारली. भद्रकाली प्रॉडक्शन संस्थेच्या या नाटकाला ७ लाख ५० हजाराचे प्रथम पारितोषिक जाहीर झाले. तर जिगिषा आणि अष्टविनायक, मुंबई या संस्थेच्या 'हॅम्लेट' या नाटकास द्वितीय व अद्वैत थिएटर्स, मुंबई या संस्थेच्या आरण्यक या नाटकाला तृतीय क्रमांक मिळाला. यांना अनुक्रमे ४ लाख ५० हजार व ३ लाखाचे पारितोषिक जाहीर झाले आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित या स्पर्धेच्या अंतिम निकाल
दिग्दर्शन
प्रथम पारितोषिक :- (१ लाख ५० हजार रुपये) चंद्रकांत कुळकर्णी (नाटक-हॅम्लेट)
द्वितीय पारितोषिक :- (१ लाख रुपये - आदित्य इंगळे (नाटक-सोयरे सकळ)
तृतीय पारितोषिक :- (५० हजार रुपये) अद्वैत दादरकर (नाटक-एका लग्नाची पुढची गोष्ट)
नाट्यलेखन
प्रथम पारितोषिक :- (१ लाख रुपये) डॉ.समीर कुलकर्णी (नाटक-सोयरे सकळ)
द्वितीय पारितोषिक :- (६० हजार रुपये) रत्नाकर मतकरी (नाटक-आरण्यक)
तृतीय पारितोषिक :- (४० हजार रुपये) दिग्पाल लांजेकर (नाटक-ऑपरेशन जटायू)
प्रकाश योजना
प्रथम पारितोषिक :- (४० हजार रुपये) प्रदिप मुळ्ये (नाटक-हॅम्लेट)
द्वितीय पारितोषिक :- (३० हजार रुपये) प्रदिप मुळ्ये (नाटक-सोयरे सकळ)
तृतीय पारितोषिक :- (२० हजार रुपये) शितल तळपदे (नाटक-आरण्यक)
नेपथ्य
प्रथम पारितोषिक :- (४० हजार रुपये) प्रदिप मुळ्ये (नाटक-हॅम्लेट)
द्वितीय पारितोषिक :- (३० हजार रुपये) प्रदिप मुळ्ये (नाटक-सोयरे सकळ)
तृतीय पारितोषिक :- (२० हजार रुपये) संदेश बेंद्रे (नाटक-ऑपरेशन जटायू)
संगीत दिग्दर्शन
प्रथम पारितोषिक :- (४० हजार रुपये) राहूल रानडे (नाटक-हॅम्लेट)
द्वितीय पारितोषिक :- (३० हजार रुपये) अजित परब (नाटक-सोयरे सकळ)
तृतीय पारितोषिक :- (२० हजार रुपये) कौशल इनामदार (नाटक-आरण्यक)
वेशभूषा
प्रथम पारितोषिक :- (४० हजार रुपये) गीता गोडबोले (नाटक-सोयरे सकळ)
द्वितीय पारितोषिक :- (३० हजार रुपये) प्रदिप मुळ्ये (नाटक-हॅम्लेट)
तृतीय पारितोषिक :- (२० हजार रुपये) मेघा जकाते (नाटक-आरण्यक)
रंगभूषा
प्रथम पारितोषिक :- (४० हजार रुपये) सचिन वारीक (नाटक-सोयरे सकळ)
द्वितीय पारितोषिक :- (३० हजार रुपये) उल्लेश खंदारे (नाटक-हॅम्लेट)
तृतीय पारितोषिक :- (२० हजार रुपये) उल्लेश खंदारे (नाटक-आरण्यक)
उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक व ५० हजार रुपये
पुरुष कलाकार : भरत जाधव (नाटक-वन्स मोअर), प्रशांत दामले (नाटक-एका लग्नाची पुढची गोष्ट), सुमीत राघवन (नाटक-हॅम्लेट), उमेश कामत (नाटक-दादा एक गुड न्यूज आहे), सतीश राजवाडे (नाटक-अ परफेक्ट मर्डर)
स्त्री कलाकार : ऐश्वर्या नारकर (नाटक-सोयरे सकळ), तेजश्री प्रधान (नाटक-तिला काही सांगायचंय), ऋता दुर्गुळे (नाटक-दादा एक गुड न्यूज आहे), प्रतिभा मतकरी (नाटक-आरण्यक), माधूरी गवळी (नाटक-एपिक गडबड)
६ मे ते २० मे या कालावधीत दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले आणि प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिर, बोरीवली या ठिकाणी अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण १० व्यावसायिक नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून अरविंद औंधे, विलास उजवणे, देवेंद्र पेम, अमिता खोपकर आणि शीतल क्षीरसागर यांनी काम पाहिले. सर्व पुरस्कार विजेत्यांचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी अभिनंदन केले आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat