मुलगा दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याचे पाहून मातेला आनंद

    दिनांक  31-May-2019 

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूकीत घवघवीत यश संपादन केल्यानंतर भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारमधील ५७ खासदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून झाली आणि त्यांच्या मातोश्री हिराबेन यानीं मोदींना टिव्ही स्क्रीन पाहिल्यावर त्यांचा आनंद गगनात मावेना. मोदींनी शपथ विधीला सुरुवात केल्यानंतर हिराबेन यांनी टाळ्या वाजवत आनंद व्यक्त केला. त्यांचा हा फोटो गुरुवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. इंटरनेटच्या महाजालावरील सर्वात सुंदर फोटो, अशी ओळही त्याला देण्यात आली होती.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या पंतप्रधानपदासाठी दुसऱ्यांदा शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला मोदींचे कुटूंबिय उपस्थित नव्हते. मात्र, गुजरातमध्ये गांधीनगर येथील रायसान गावात राहणाऱ्या हिराबेन हा सोहळा टिव्हीवरून पाहत होत्या. मोदींचा चेहरा जेव्हा टिव्हीवर दिसल्या तेव्हा त्यांनी आनंदाने टाळ्या वाजवायला सुरुवात केली. यावेळी तिथे असलेल्या उपस्थितांनी दोन फोटो कॅमेऱ्यात कैद केले. जेव्हा मोदी यांनी शपथ घेण्यासाठी मंचावर प्रवेश केला त्यावेळी आणि त्यानंतर जेव्हा शपथविधीला सुरुवात झाली तेव्हाचा दुसरा फोटो. हे दोन्ही फोटो व्हायरल झाले आहेत. हा फोटो नेटीझन्सकडून सर्वात जास्त शेअर करण्यात आला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat