वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर विराटचे नवीन गाणे पाहिले का?

31 May 2019 15:24:45

 
 

भारत देशात क्रिकेट हा देखील एक जीवनपद्धतीचा भाग आहे असे म्हटले जाते आणि ते खरे देखील म्हणता येईल. भारतीयांना क्रिकेट या खेळाविषयी प्रचंड प्रेम आणि आस्था असल्यामुळे सध्या देशवासीयांचे लक्ष वर्ल्डकपवर खिळलेले आहे. अशातच आज विराट कोहलीने वर्ल्डकप विषयी भाष्य करणारे आणि टीम इंडियाचा जोश दर्शवणारे एक गाणे सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केले.

 

लोकप्रिय रॅपर डिव्हाईन आणि विराट कोहली यांनी पुमा या स्पोर्ट्स कंपनीच्या मदतीने हे गाणे तयार केले. सीधा सीधा शॉट देते है...असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्याच्या माध्यमातून भारतीय क्रिकेट संघ वर्ल्ड कपसाठी सज्ज झाला आहे अशा आशयाचे रॅप या गाण्यामध्ये करण्यात आले असून सर्वांना ठेका ठरायला लावेल असे हे गाणे क्रिकेट प्रेमींसाठी पर्वणीच.

 

सध्या वर्ल्डकप २०१९ ला सुरुवात झाली असून भारतीय संघाने आत्तापर्यंत चांगली कामगिरी केली असून येत्या ५ जून ला भारतीय संघाचा सामना दक्षिण आफ्रिकेच्या संघाशी होणार आहे. त्यामुळे आता भारतीय संघाने या सामन्यापूर्वीच दक्षिण आफ्रिकेच्या संघाला या गाण्याच्या माध्यमातून चेतावनी दिली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
Powered By Sangraha 9.0