कोकण प्रांत प्रथम वर्ष संघ शिक्षा वर्गाचा शनिवारी समारोप

    दिनांक  31-May-2019


 

डहाणू : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, कोकण प्रांताने आयोजित केलेल्या यंदाच्या प्रथम वर्ष संघ शिक्षा वर्गाचा प्रकट समारोप येत्या शनिवार १ जून रोजी संपन्न होणार आहे. या प्रकट समारोपास आंतरराष्ट्रीय वारली चित्रकार सदाशिव जिव्या मशे हे प्रमुख पाहुणे या नात्याने उपस्थित राहणार आहेत. तसेच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र धर्मजागरण प्रमुख श्यामजी हरकरे याप्रसंगी मार्गदर्शन करणार आहेत.

 

प्रकट समारोप डहाणू (प.) येथील सेंट मेरी हायस्कूल या ठिकाणी संध्याकाळी ६ वा. संपन्न होणार आहे. या समारोपास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पालघर जिल्हा संघचालक गोपीनाथ भीमा अंभिरे आणि या संघ शिक्षा वर्गाचे वर्गाधिकारी उदय दिनकर कुलकर्णी यांनी केले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat