'सत्यशोधक' वर्षअखेरीस प्रदर्शित होण्याची शक्यता

31 May 2019 16:30:24


 

डोंबिवली फास्ट आणि डोंबिवली रिटर्न या चित्रपटांमधून प्रेक्षकांची प्रशंसा प्राप्त झालेला संदीप कुलकर्णी आणि सध्या सेक्रेड गेम्स या सिरीजमध्ये डिजिटल माध्यमात झळकलेले अभिनेत्री राजश्री देशपांडे 'सत्यशोधक' या आगामी चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. हा चित्रपट या वर्षाच्या अखेरपर्यंत प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

 

नावाप्रमाणेच हा चित्रपट सत्यशोधक समाजाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील संघर्षावर आणि त्यांच्या जीवनप्रवासावर आधारित आहे. संदीप कुलकर्णी ज्योतिबांची तर राजश्री सावित्रीबाईंची भूमिका साकारणार आहेत.

 

निलेश जळमकर यांनी या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन केले असून या चित्रपटाच्या माध्यमातून फुलेंचे सामाजिक कार्य प्रेक्षकांपर्यंत पोचण्यास मदत होईल. संदीप कुलकर्णी हा एक प्रभावशाली अभिनेता असून त्याचा 'कृतांत' नावाचा चित्रपट १ जूनला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
Powered By Sangraha 9.0