मोदी २.० सरकारमध्ये 'हे' आहेत महत्वाचे नेते

    दिनांक  31-May-2019


 

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व विजय मिळवत नरेंद्र मोदी सरकार पुन्हा एकदा सत्तेत आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळातील एकूण ५७ मंत्र्यांसह नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. यामध्ये अमित शाह, नितीन गडकरी, स्मृती इराणी, प्रकाश जावडेकर, राजनाथ सिंह, निर्मला सीतारमण, अरविंद सावंत, रामदास आठवले आदींसह इतर प्रमुख नेत्यांनी शपथ घेतली. गेल्या सरकारमधील ४० टक्के चेहरे नव्या मंत्रिमंडळात दिसले नाहीत. आता लवकरच खातेवाटपही जाहीर होणार आहे.

 

अमित शाह

सध्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. २०१९ लोकसभा निवडणूकीत गांधीनगर येथून विजयी झाल्यानंतर त्यांची मंत्री पदासाठी चर्चा आहे. त्यांना गृहमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.

 

नितीन गडकरी

भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष असलेले नितीन गडकरी यांनी २०१४ साली स्थापन झालेल्या सरकारामध्ये रस्ते वाहतुकमंत्री आणि जल संधारण, नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्री म्हणून काम पाहत आहेत. आता, नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या मंत्रिमंडळात सरकारात त्यांचीही रस्ते व वाहतूक मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. गडकरींनीही यापूर्वीच तशी इच्छा व्यक्त केली जात आहे.

 

राजनाथ सिंह

भाजपमधील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. सध्या केंद्रीय गृहमंत्री आहेत. परंतु, अमित शाह यांचे गृह मंत्रीपदासाठी चर्चा सुरू असल्यामुळे त्यांना दुसरे मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.

 

निर्मला सीतारमण

मनोहर पर्रिकर यांच्यानंतर संरक्षण खात्याच्या पहिल्या संरक्षण मंत्री म्हणून काम पाहिले. राफेल मुद्यासह संरक्षण खात्यात अनेक महत्वाच्या मुद्यावर चांगली कामगिरी केली आहे. आताही संरक्षण मंत्री पदी कायम राहण्याची शक्यता आहे.

 

प्रकाश जावडेकर

२०१४ साली भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर पर्यावरण मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. स्मृती इराणी यांच्यानंतर सध्या भाजप सरकारमध्ये मनुष्यबळ विकास मंत्री. नवीन सरकारामध्ये त्यांची दुसऱ्या खात्यात वर्णी लागण्याची शक्यता आहे.

 

स्मृती इराणी

राहुल गांधी यांचा अमेठीत पराभव केला. मागील कार्यकाळात मनुष्यबळ विकासमंत्री आणि वस्त्रोद्योग म्हणून काम पाहिले आहे. या क्षेत्रातील विविध योजनांमध्ये त्यांचे महत्वाचे योगदान आहे. नवीन कार्यकाळात दुसरे खाते मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat