पबजीचा आणखी एक बळी ; १६ वर्षीय फुर्कनचा मृत्यू

    दिनांक  31-May-2019


 


इंदूर : सध्या मुलांमध्ये 'पबजी'चे वेड वाढले आहे. अगदी लहानमुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत या मोबाईलमधील खेळामुळे अनेक जणांनी आपले प्राण गमावले आहे. मध्य प्रदेशातील निमचमध्येही एका १६ वर्षीय मुलाला सलग ६ तास पबजी खेळल्याने हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला. मृत्यू अगोदर तो ब्लास्ट कर, ब्लास्ट कर असे ओरडला होता. यानंतर त्याल रूग्णालयातही नेण्यात आले होते, मात्र डॉक्टरांनी त्यांच्या मेंदूवर अतिदाब आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

 

फुर्कन कुरेशी असे या मुलाचे नाव असून त्याचा मृत्यू छोटी बहिण फिजासमोर झाला. पबजी खेळत असतानाच तो मोठ्मोठ्यानं ओरडू लागला आणि हृदयविकाराचा झटका येऊन तो खाली कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता, अशी माहिती त्याचे वडील हारुन रशिद कुरेशी यांनी दिली. त्याच्या बाहिनेने सांगितले की, 'तो मृत्यू अगोदर अयान तु मला मारलस, मी हारलो. आता तुझ्या बरोबर नाही खेळणार असे जोर जोरात ओरडत होता.'

 

'फुर्कन हा पबजीच्या पूर्णपणे आहारी गेला होता. कधी-कधी दिवसातील १८ तास तो फक्त पबजी गेम खेळायचा.' अशी माहिती त्याचा भाऊ मोहम्मद हासिम याने दिली. 'व्हिडिओ गेम खेळता खेळता अतिउत्साहाच्या भरात त्याच्या हृदयाचे ठोके वाढले असावेत आणि त्याला हृदयविकाराचा झटका आला असावा,' असा प्राथमिक अंदाज डॉ. अशोक जैन यांनी व्यक्त केला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat