‘मीडियम स्पाइसी’ टीमने शेअर केला ललित प्रभाकरचा व्हिडीओ

30 May 2019 14:24:30



मीडियम स्पाइसीया मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली असून या चित्रपटात एक प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेता ललित प्रभाकर बरोबर चित्रपटाच्या टीमने एक युनिक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यातून सेटवर असणाऱ्या कलाकारांकडून चित्रपटाच्या मूड विषयी काहीशी माहिती मिळते. ललितने त्याच्या व्यक्तिरेखेबद्दल आपल्या चाहत्यांना सांगितले आहे.

 
 
 

सई ताम्हणकर, ललित प्रभाकर आणि पर्ण पेठे यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या मीडियम स्पाइसी या चित्रपटातून नाट्य क्षेत्रात कार्यरत असणारे मोहित टाकळकर हे दिग्दर्शक म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत.

 

विधि कासलीवाल यांची निर्मिती असलेला मीडियम स्पाइसीया चित्रपटाची कथा शहरी जीवनावर आधारित असून आजच्या पिढीचे नात्यांविषयीचे विचार तसेच त्यांचे निरनिराळे दृष्टीकोन चित्रपटात दिसणार आहेत. लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत मीडियम स्पाइसीचे चित्रीकरण सलगपणे होणार आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
Powered By Sangraha 9.0