मोदींसह 'हे' ५० खासदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

    दिनांक  30-May-2019 

 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. मोदीसोबतच एनडीएमधील इतर ५० नेतेही मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात सायंकाळी ७ वाजता हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. २३ मे रोजी झालेल्या मतमोजणीत भाजप व एनडीएने ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पंतप्रधानपद निश्चित मानले जात होते. मात्र मोदींच्या मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळणार याची चर्चा व उत्सुकता मागील आठवड्यापासून देशभरात पाहायला मिळत होती.

 

मागील मोदी सरकारच्या काळातील मंत्र्यांचे मंत्रिपद कायम राहणार असल्याचे सांगितले जात होते. तर काही मंत्र्यांना डच्चू देण्यात येणार असल्याचेही बोलले जात होते. त्यामुळे कोणाचे मंत्रिपद जाणार आणि कोणाचे मंत्रिपद कायम राहणार तसेच कोणाला नव्याने संधी मिळणार याची चर्चा देशभरात सुरु होती. अखेर आज काही नावे समोर आली असून हे नेते आजच्या शपथविधी सोहळ्यात शपथ घेणार असल्याचे जवळपास निश्चित असल्याचे मानले जात आहे. यापैकी बहुतांश खासदारांना पंतप्रधान कार्यालयातून फोन करून कळवण्यात आले आहे. यावरून आज ४५ ते ५० खासदार मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.

 

शपथ घेणाऱ्या मंत्र्यांची यादी खालीलप्रमाणे

 

अजुर्नराम मेघवाल, जितेंद्र सिंह, किशन रेड्डी, राम विलास पासवान, सुरेश अंगड़ी, प्रह्लाद जोशी, मुख्‍तार अब्‍बास नकवी, धर्मेंद्र प्रधान, हरसिमरत कौर, बाबुल सुप्रियो, सुषमा स्‍वराज, स्‍मृती ईरानी, निर्मला सीतारमण, रविशंकर प्रसाद, रमेश पोखरियाल निशंक, प्रल्हाद पटेल, कैलाश चौधरी, थावरचंद गहलोत, किशन पाल गुर्जर, साध्‍वी निरंजन ज्‍योति, किरन रिजिजु, नरेंद्र तोमर, सदानंद गौड़ा, आरसीपी सिंह, पुरुषोत्‍तम रुपाला, गजेंद्र शेखावत, अनुप्रिया पटेल, राव इंद्रजीत, संजीव बालियान, नित्यानंद राय, रामविलास पासवान, अनुप्रिया पटेल, रामनाथ ठाकूर, सोम प्रकाश, राज्यवर्धन राठोड, अर्जुन मुंडा, देबश्री चौधरी, कैलाश चौधरी, ललन सिंह. पवन वर्मा, थावरचंद गेहलोत

 

महाराष्ट्रातील मंत्री

 

रामदास आठवले, पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर, अरविंद सावंत, रावसाहेब दानवे, नितीन गडकरी, संजय धोत्रे

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat