नरेंद्र मोदी मालदीवच्या संसदेला संबोधित करणार

    दिनांक  30-May-2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. शपथविधी झाल्यानंतर लगेचच ते कामकाजाला सुरुवात करणार आहेत. यापूर्वीच एक मोठी बातमी समोर येत असून पंतप्रधान मोदी हे मालदीवच्या संसदेला संबोधित करणार आहेत. यासाठी मालदीवच्या संसदेत एक ठरावही मंजूर करण्यात आला आहे.

 

शपथविधीनंतर पंतप्रधान मोदी ७ आणि ८ जून दरम्यान मालदीव दौऱ्यावर जाणार असल्याचे बोलले जाते. या दौऱ्यादरम्यान मोदींनी मालदीवच्या संसदेला संबोधित करावे यासाठी मालदीवच्या संसदेने ठराव मंजूर केला आहे. मालदीवचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला शाहिद यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींना संसदेला संबोधित करण्याचे निमंत्रण दिले असल्याचे सांगितले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat