मुंबई पुणे प्रवास अवघ्या १५० मिनिटांमध्ये

    दिनांक  30-May-2019मुंबई : मुंबई ते पुणे इंटरसिटी एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. येत्या ३१ मेपासून सात दिवसांसाठी नवीन वेळापत्रकानुसार इंटरसिटी एक्स्प्रेस धावणार आहे. ज्यामध्ये ही गाडी ३ तास १७ मिनिटांऐवजी २ तास ३५ मिनिटांमध्ये पुणे पोहचेल. त्यामुळे प्रवाशांचा जवळपास ४० मिनिटे वाचणार आहेत.

 

इंटरसिटी एक्स्प्रेसला पुश अॅण्ड पूलचे डबल इंजिन लावून चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाली. त्यामुळे इंटरसिटी एक्स्प्रेस पुढील सात दिवसांसाठी नव्या वेळापत्रकानुसार धावेल. जर या सात दिवसात गाडी व्यवस्थित वेळापत्रकानुसार, इतर गाड्यांच्या वेळेला धक्का न लावता, प्रवाशांचा सोयीने धावली तर हेच वेळापत्रक कायम ठेवले जाणार आहे.

 

मुंबई ते पुणे १९२ किलोमीटरचे अंतर आहे. इंटरसिटी एक्स्प्रेसला हे अंतर कापण्यासाठी ३ तास १७ मिनिटांचा कालावधी लागतो. कर्जत घाटात सेक्शन असल्यामुळे बॅंकर जोडणे आणि काढणे यासाठी अतिरिक्त वेळ लागतो. आता पुश-पुल इंजिनामुळे या गाडीला या प्रवासासाठी २ तास ३५ मिनिटे लागणार आहे. यामुळे इंटरसिटी एक्स्सतच्या वेळेत जवळपास ४० मिनिटांची बचत होणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat