शपथविधीपूर्वी गांधीजी आणि अटलजींच्या चरणी नतमस्तक

    दिनांक  30-May-2019


 


नवी दिल्ली : पंतप्रधान पदाच्या दुसऱ्या कार्यकाळासाठी गुरुवारी सायंकाळी ७ वाजता नरेंद्र मोदींचा शपथविधी होणार आहे. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी सकाळी महात्मा गांधीजी आणि अटलजींच्या चरणी नतमस्तक झाले. मोदींनी राजघाटवर गांधीजींच्या समाधीचे दर्शन घेऊन आदरांजली वाहिली. यावेळी नरेंद्र मोदी यांच्यासोबत भाजपाध्यक्ष अमित शहा हेदेखील उपस्थित होते. यानंतर मोदींनी राष्ट्रीय युद्धस्मारकालाही भेट दिली. शपथविधीची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

 
 
 

नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी देश-विदेशांतील ६ हजार पाहुणेमंडळी सहभागी होत आहेत. पाकिस्तान वगळता बांगलादेश, भूतान, नेपाळ, श्रीलंका, म्यानमार, थायलंड या बिमस्टेक देशांचे प्रमुखही सोहळ्याला उपस्थित असतील. शंभरहून अधिक अनिवासी भारतीय खास या शपथविधी सोहळ्यासाठी दिल्लीत दाखल होत आहेत. 

 
 
 
 
शपथविधी सोहळ्यानंतर राष्ट्रपती भवनात निवडक पाहुण्यांसोबत पंतप्रधान मोदी यांचे रात्रीभोज आयोजित करण्यात आले आहे.
 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat