डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण क्राईम ब्रांचकडे

    दिनांक  30-May-2019मुंबई : डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणाची तपासणी मुंबई क्राईम ब्रांचकडे सोपविण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तडवी कुटुंबीयांनी गुरुवारी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्यासह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

 

मुंबईतील पालिकेच्या नायर रूग्णालयात गेल्या बुधवारी डॉ. पायल तडवी यांनी आत्महत्या केली होती. त्या पदव्युत्तर शिक्षणाच्या दुसऱ्या वर्गाला शिकत होत्या. वरिष्ठांकडून होणाऱ्या रॅंगिग आणि त्रासामुळे डॉ. पायल यांनी आत्महत्या केली होती. याप्रकरणातील तीन आरोपींना अखेर बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्यांना न्यायालयाने शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

गुरुवारी डॉ. पायल यांच्या कुटुंबियांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी केली जाईल असे आश्वासन डॉ. पायल यांच्या कुटुंबियांना दिले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat