पुढील एक महिना काँग्रेस राहणार चर्चेपासून लांब...

    दिनांक  30-May-2019नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत भाजपकडून झालेला काँग्रेसचा पराभव हा त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे पुढील एक महिना काँग्रेस कुठल्याही चर्चेत सहभागी राहणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. आपल्या प्रवक्त्यांना टीव्हीवरील वादविवाद कार्यक्रमात बोलावण्यात येऊ नये, असे आवाहन सर्व वृत्तवाहिन्यांना करण्यात आहे.

 
 
 

काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करत सांगितले की, 'पुढील एक महिना कोणत्याही वाहिन्यांवर चर्चेत सहभागी होण्यसाठी पक्षातून कोणत्याही प्रवक्त्यांना पाठवण्यात येऊ नये, असा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. सर्व वाहिन्यांना आणि संपादकांना विनंती आहे की त्यांनी काँग्रेस प्रतिनिधींना सहभागी करू नये.' याआधी समाजवादी पक्षानेदेखील हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाने काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने मौन बाळगल्याने दिसत आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat