
परेश रावल यांच्या बाबुराव गणपतराव आपटे या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर मोहिनी घालणारे चतुरस्त्र अभिनेते. आज त्यांचा ६९ वा वाढदिवस. होली नावाच्या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलेल्या या अभिनेत्याने सहकलाकाराच्या भूमिकेचे महत्व अख्या चित्रपट सृष्टीला जाणवून दिले असे म्हणायला हरकत नाही. आपल्या मिश्किल स्वभावाने त्यांनी बहुसंख्य प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.
१८८४ साली होली या चित्रपटातून त्यांनी सिनेसृष्टीती पदार्पण केले खरे मात्र त्यानंतर नाम नावाच्या चित्रपटात त्यांनी केलेल्या भूमिकेमुळे त्यांना चित्रपटात जगतात एक नवी ओळख मिळाली आणि मग त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिलेच नाही. सहकलाकार, खलनायक, विनोद अशा कित्येक भूमिका त्यांनी कौशल्याने वठवल्या. तब्बल १०० चित्रपटांमध्ये त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली आहे. मात्र त्यानंतर २००० साली प्रदर्शित झालेल्या 'हेरा फेरी' या चित्रपटाने त्यांनी एका आपल्या आयुष्यातील एका नव्या पर्वाला सुरुवात केली. त्या चित्रपटातील त्यांची बाबुभाई या पात्राची भूमिका इतकी गाजली की त्यानंतर कित्येक वर्ष प्रेक्षक त्यांना बाबुभाई याच नावाने ओळखत असत. त्यांच्या या भूमिकेला सर्वश्रेष्ठ हास्यकलाकार म्हणून फिल्मफेअर पुरस्काराने गौरवण्यात आले.
तसेच ओ माय गॉड मधील एका नास्तिक व्यक्तीची भूमिका आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या उरी या चित्रपटातील भारताचे संरक्षण सल्लागार अजित डोवाल यांची त्यांनी साकारलेली भूमिका अजूनही प्रेक्षकांच्या स्मरणात राहील अशीच आहे. तसेच सध्या राजकारणात देखील त्यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. तसेच सध्या राजकारणात देखील त्यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांना एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून पहिले जाते.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat