हिंगोलीत गॅस सिलेंडरचा स्फोट ; ३ जणांचा मृत्यु

03 May 2019 12:26:57



हिंगोली : हिंगोलीतील कुरुंदा येथील एका घरात शुक्रवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटात घरातील तिघांचा दुर्देवी मृत्यू झाला. सोनाजी आनंदराव दळवी (५५ वर्षे), पत्नी सुरेखा सोनाजी दळवी (५० वर्षे), मुलगी पूजा सोनाजी दळवी (२३ वर्षे) अशी स्फोटात मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत.

 

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री मध्यरात्री सोनाजी आनंदराव दळवी यांच्या घरातील सिलेंडरमधून अचानकपणे गळती होऊ लागली. त्यामुळे शेगडी आणि सिलेंडर वेगळे ठेवले होते. रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास वीज पुरवठा खंडित झाला. तेव्हा दळवी यांनी इतर इलेक्ट्रीक साधनांच्या वापर केला. मात्र, गळती झालेल्या सिलेंडरचा अचानकपणे स्फोट झाला. त्यामुळे संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. यात तिघांचा होरपळून मृत्यू झाला.

 

पूजा दळवी ही पुण्यात बीएचएमएसचे शिक्षण घेत होती. मात्र लग्नासाठी ती कुरुंदा इथे आई-वडिलांकडे आली होती. हा स्फोट एवढा शक्तीशाली होता की दळवी कुटुंबाचे पूर्ण घर जळून खाक झाले. अग्निशमन दल, पोलिस आणि गावकऱ्यांनी आग विझवली. मात्र या स्फोटात तिघेही दगावल्याने कुरुंदा गावावर शोककळा पसरली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0