नवीन पटनाईक आणि पेमा खांडू यांचा शपथविधी संपन्न

    दिनांक  29-May-2019ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक आणि अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून पेमा खांडू यांचा मुख्यमंत्रीपद स्वीकारण्यापूर्वी आयोजित करण्यात येणारा शपथविधी सोहळा आज पार पडला. अरुणाचल प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्यासह मंत्रिमंडळातील अन्य ११ मंत्र्यांचा शपथविधी आज पार पडला तर ओडिसामध्ये देखील मंत्रिमंडळातील ११ आणि अन्य ९ मंत्र्यांचा शपथ ग्रहणाचा समारोह पार पडला.

 

नवीन पटनाईक यांनी यावेळी सलग पाचव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ ग्रहण केली आहे. ओडिसाचे राज्यपाल प्रो. गणेशी लाल यांच्या उपथिती हा सोहळा पार पडला. तर अरुणाचल प्रदेशमध्ये राज्यपाल डॉ. बी.डी. शर्मा यांच्या उपथित पेमा खांडू यांना गोपनीयतेची शपथ देण्यात आली. नवीन पटनाईक यांच्या मंत्रिमंडळात यावर्षी १० नवीन चेहरे पाहायला मिळणार असून मंत्रिमंडळातील ३ महिला मंत्र्यांपैकी २ मंत्र्यांचे नवीन चेहरे पाहायला मिळणार आहेत.

 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नवीन पटनाईक यांना शुभेच्छा दिल्या असून सिक्कीमचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री प्रेम सिंह तमंग यांना देखील शुभेच्छा दिल्या आहेत.

 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat