बिमस्टेकचे प्रतिनिधी मोदींच्या शपथविधी सोहळ्यात उपस्थित राहणार

    दिनांक  29-May-2019


भारतीय जनता पक्षाच्या अभूतपूर्व यशानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीकडे देशवासीयांचे लक्ष लागले आहे. या शपथविधी सोहळ्याचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले असून बिमस्टेक देशातील प्रतिनिधींना खास या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले होते. दरम्यान या देशातील सर्व प्रतिनिधींनी या सोहळ्यात सहभागी होणार असल्याचे पंतप्रधानांना अधिकृतरीत्या आज कळवले आहे.

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी सांगितले की, बांगलादेशचे अध्यक्ष एम डी. अब्दुल हमिद, श्रीलंकाचे अध्यक्ष मैथ्रिपाला सरिसेना, म्यानमारचे अध्यक्ष यू विन मायंट, नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली, भूतानचे पंतप्रधान डॉ. लोटय शेहरिंग आणि थायलंडचे विशेष दूत ग्रिसादा बून्राच यांनी त्यांच्या सहभागाची पुष्टी केली आहे.

मॉरीशसचे पंतप्रधान प्रवीण कुमार जुग्नुथ आणि किरगिझ प्रजासत्ताकचे अध्यक्ष सूरोनबे जिनबेकॉव्ह यांनीही या कार्यक्रमात त्यांच्या सहभागाची पुष्टी केली. नवी दिल्लीतील या कार्यक्रमासाठी निमंत्रित मान्यवरांच्या स्वागतासाठी उत्सुक असल्याचे कुमार यांनी सांगितले आहे. उद्या सकाळी ७ वाजता राष्ट्रपती भवन येथे आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील इतर सदस्यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडेल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat