प्रकृतीच्या कारणास्तव जेटलींनी नाकारले मंत्रीपद

    दिनांक  29-May-2019नवी दिल्ली : माजी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सक्रिय राजकारणातून माघार घेतली आहे, असे सांगणारे पत्र अरूण जेटलीनी पंतप्रधान मोदी यांना पाठवले आहे. जेटली यांनी या पत्रात आपल्या प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे सरकारला पुढे वेळ देऊ शकणार नाही.

 

"मला सरकारच्या मंत्रीमंडळाच्या कोणत्याही पदाची जबाबदारी देऊ नये," असे त्यांनी म्हटले आहे. नरेंद्र मोदी गुरूवारी संध्याकाळी ७ वाजता राष्ट्रपती भवनात शपथ घेणार आहेत. जेटली यांनी आपल्या पत्रात असेही लिहीले की, सरकार किंवा पक्षाच्या कामात अनौपचारिकरित्या काम करण्यास तत्पर असेन. अरूण जेटली यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात मंत्रीपदाचा नकार देत त्यामागे प्रकृती अस्वास्थ्याचे कारण असल्याचे सांगत हा निर्णय घेतल्याचे या पत्रात त्यांनी सांगितले आहे.

 
 
 

अरुण जेटली या वर्षी जानेवारीत उपचारासाठी अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये गेले होते. या दरम्यान पीयूष गोयल यांना अर्थमंत्र विभागाचे अतिरीक्त कारभार सोपविण्यात आले होते. जेटलींच्या अनुपस्थितीमध्ये गोयल यांना १४ मे पासून २२ ऑगस्ट २०१८ दरम्यान अर्थ विभागाचा कारभार देण्यात आला होता.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat