झूमकारद्वारे सेल्फ-ड्राइव्ह कार बुकिंगवर १०० टक्के सूट

    दिनांक  29-May-2019मुंबई : झूमकार या भारतातील आघाडीच्या सेल्फ ड्राइव्ह कार रेंटल कंपनीने ६ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने लव्हयूबॅकसेलची घोषणा केली आहे. या सेलअंतर्गत झूमकार ८ जून ते २५ नोव्हेंबर या बुकिंग कालावधीसाठी ३०-३१ मे रोजी केलेल्या सर्व सेल्फ-ड्राइव्ह बुकिंगवर १०० टक्के सुट दिली आहे. म्हणजेच वापरकर्त्यांना राइड पूर्णपणे मोफत मिळेल. ग्राहक एलयूव्ही१०० (LUV१००)या प्रोमोकोडचा वापर करून या जबरदस्त ऑफरचा लाभ घेऊ शकतात.

 

या विशेष ऑफरव्यतिरिक्त, पेटीएम फ्लाईट्सतर्फे मोफत फ्लाईट व्हाउचर्स आणि क्लब महिंद्राचे एक्सपेरिएंशिअल हॉलिडे व्हाउचर सुद्धा उपलब्ध आहेत. एवढेच नव्हे तर ओयो, फ्लिपकार्ट, टायटन, क्लिअरट्रीप आणि पेटीएम सारख्या भागीदारांकडून प्रत्येक बुकिंगवर १० हजारांचे निश्चित डिस्काउंट हॅम्परही देण्यात येणार आहेत.

 

झूमकारचे संस्थापक आणि सीईओ ग्रेग मोरन म्हणाले की, “झूमकारसाठी गेल्या सहा वर्षांचा प्रवास विलक्षण होता कारण की आम्ही भारतात सेल्फ-ड्राइव्ह रेंटलची संकल्पना रूजवली. २०१३ मधील आमच्या पहिल्या शहरापासून २०१९ मध्ये आमच्या ४७ व्या शहरापर्यंत आम्ही ७ दशलक्ष व्यवहारांसाठी सेवा प्रदान केली आहे. जवळपास ५ दशलक्ष लोकांनी झूमकारचा अनुभव घेतला आहे. आमच्या ग्राहकांच्या प्रचंड पाठिंब्याशिवाय हा प्रवास करणे शक्यच झाले नसते. आभार व्यक्त करण्यासाठी आम्ही वर्धापनदिन सेलद्वारे सेल्फ-ड्राइव्ह प्रेमाचा एक जबरदस्त डोस परत करीत आहोत."

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat