पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनी वाहिली सावरकरांना आदरांजली

28 May 2019 15:58:01



मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटरवरून एक व्हिडिओ शेअर करत स्वातंत्रवीर सावरकरांना श्रद्धांजली अर्पण केली. या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकला. सावरकर बलवान भारतासाठी साहस आणि देशभक्तीचे प्रतीक असून सावरकरांनी अनेक लोकांना राष्ट्राच्या उभारणीसाठी समर्पित करण्याचे काम केल्याचे त्यांनी या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.


तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. देश, धर्म, भाषा, विचार आणि संस्कृतीचा जाज्वल्य अभिमान आणि विषमतामुक्त समाज निर्माण करणे हीच स्वातंत्र्यवीर सावरकरांना हीच खरी आदरांजली ठरेल, असे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0