रतन टाटा ठरले मोस्ट ट्रस्टेड बिझनेस पर्सनलिटी

28 May 2019 16:17:32



 

मुंबई : विविध व्यक्तिमत्त्वांवर चाहत्यांचा व समर्थकांचा प्रचंड विश्वास असतो. हे विचारात घेऊन, टीआरए रिसर्च या भारतातील आघाडीच्या कन्झ्युमर-इनसाइट्स कंपनीने टीआरएज मोस्ट ट्रस्टेड पर्सनॅलिटीज-२०१९ हा अहवाल प्रकाशित केला असून, त्यामध्ये सिनेमा, क्रीडा, बिझनेस आदी क्षेत्रांतील ३९ व्यक्तिमत्त्वांचा समावेश करण्यात आला आहे. १६ शहरांतील २ हजार ३१५ ग्राहकांच्या मदतीने ही पाहणी करण्यात आली.

बिझनेस व्यक्तिमत्त्वांमध्ये, टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांना इंडियाज मोस्ट ट्रस्टेड बिझनेस पर्सनॅलिटी म्हणून स्थान देण्यात आले आहे, तर त्यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा समावेश आहे. हिंदी सिनेमाचे शहेनशहा व नुकताच सुवर्णमहोत्सव साजरा केलेले अमिताभ बच्चन यांनी इंडियाज मोस्ट ट्रस्टेड पर्सनॅलिटीच्या यादीमध्ये सर्वोच्च स्थान मिळवले आणि अभिनेत्यांच्या यादीतही बाजी मारली. त्यांच्यानंतर, दुसऱ्या क्रमांकावर आमिर खान व तिसऱ्या क्रमांकावर सलमान चुलबुलखान आहेत.

 

अक्षय इंटरव्ह्यूकुमार यांनी चौथे स्थान पटकावले, तर बॉलीवूड किंग शाहरूख खान यांनी पाचवे स्थान पटकावले. दक्षिणेकडील अभिनेत्यांमध्ये, रजनीकांत यांनी अग्रेसर स्थान पटकावले. त्यांच्यानंतर दुसरा क्रमांक विजय यांनी व तिसरा क्रमांक विक्रम यांनी मिळवला. बॉलीवूडमधील दीपिका पदुकोण इंडियाज मोस्ट ट्रस्टेड फिमेल अॅक्टर आहे, तर त्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी अनुक्रमे कतरिना कैफ व माधुरी दीक्षित आहेत. अष्टपैलू अभिनेत्री आलिया भट चौथ्या स्थानी आहे, तर त्यानंतर पाचव्या क्रमांकावर काजोल आहे.

 

या सर्व व्यक्ती घराघरांत परिचयाच्या आहेत आणि ग्राहकांना त्या अतिशय जवळच्या वाटतात. पडद्यावर उत्कृष्ट काम करण्याबरोबरच, प्रेक्षकांशी विश्वासाचे सक्षम नाते निर्माण करणाऱ्या कलाकारांची यादी टीआरएज मोस्ट ट्रस्टेड पर्सनॅलिटी २०१९ रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे”, असे टीआरए रिसर्चचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. चंद्रमौली यांनी सांगितले.

 

क्रीडा क्षेत्रातील व्यक्तिमत्त्वांमध्ये, दमदार कामगिरी व ब्रँडशी सहयोग, यामुळे विराट कोहलीने मोस्ट ट्रस्टेड स्पोर्ट्स पर्सनॅलिटी म्हणून स्थान मिळवले. त्यानंतर दुसरा क्रमांक मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि तिसरा क्रमांक रोहित शर्मा यांनी पटकावला. मदर तेरेसा (अध्यात्मिक व्यक्तिमत्त्व) संदीप महेश्वरी (यू ट्यूबर), सुधा मूर्ती (लेखिका) व अण्णा हजारे (सामाजिक कार्यकर्ते) यांचाही समावेश मोस्ट ट्रस्टेड लिस्टमध्ये करण्यात आला आहे आणि या श्रेणीमध्ये ते एकमेव आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat




Powered By Sangraha 9.0