विहिंपचे व्यकंटेश आबदेव यांचे दुःखद निधन

    दिनांक  28-May-2019
पुणे : विश्व हिंदू परिषदेचे सचिव (विशेष संपर्क विभाग) व्यकंटेश नारायण आबदेव यांचे सोमवारी रात्री साडेदहा वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. पुण्यातील राव हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ते ६६ वर्षांचे होते. दहा दिवसांपूर्वी ते आजारी पडल्याने त्यांना राव हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांच्या प्रकृतीने उपचाराला साथ दिली नाही. त्यांच्या निधनाची बातमी समजताच देशरातून दुःख व्यक्त केले जात आहे.

 

मागील ३० वर्षांपासून विश्व हिंदू परिषदेचे ते पूर्ण वेळ काम पाहत होते. यासोबतच ते मुरुड परिसरातील कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करीत होते. दोन वर्षांपूर्वी जयपूर राजस्थान येथे त्यांना अर्धांगवायूचा झटका आला आणि तेव्हा पासून त्यांची प्रकृती अस्थिर होती. दरम्यान, त्यांचा अंत्यविधी उद्या, मंगळवारी २८ मे रोजी सायंकाळी ५ वाजता पुण्यातील नवी पेठ वैकुंठ स्मशानभूमी येथे होणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat