१७ जूनपासून विधानसभेचे पावसाळी अधिवेशन

    दिनांक  28-May-2019
मुंबई : विधानसभेचे पावसाळी अधिवेशन येत्या १७ जूनपासून सुरू होणार आहे. तीन आठवडे चालणाऱ्या या अधिवेशनात कामकाजाचे केवळ १२ दिवस असतील. आज झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत पावसाळी अधिवेशनाची रूपरेखा ठरविण्यात आली. पावसाळी अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प १८ जून रोजी मांडला जाणार आहे.

 

यानंतर २१ व २४ जून रोजी अर्थसंकल्पावर चर्चा होणार आहे, तर राज्यपालांचे अभिभाषण, चर्चा १९ व २० जून रोजी होईल. गेल्या वर्षी पावसाळी अधिवेशन नागपुरात घेऊन फडणवीस सरकारने नवा पायंडा पाडला होता. पण नागपुरातील पावसाचा कटू अनुभव लक्षात घेऊन सरकारने यावेळचे पावसाळी अधिवेशन मुंबईत घ्यायचे ठरवले आहे. भाजप-शिवसेना सरकारचे हे अखेरचे अधिवेशन असेल. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. नव्या सरकारचे पहिले अधिवेशन हिवाळी असेल आणि ते परंपरेप्रमाणे नागपुरात होणार असल्याचे समजते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat