डीआरडीओचे मोठे यश; 'आकाश एमके-१एस' मिसाईलची यशस्वी चाचणी

    दिनांक  28-May-2019


 


नवी दिल्ली : संरक्षण संशोधन व विकास संघटनेने (डीआरडीओ) 'आकाश एमके-१एस' या हवाई संरक्षण क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. 'आकाश एमके-१एस' ही आकाश क्षेपणास्त्राची प्रगत आवृत्ती असून यामध्ये स्वदेशी बनावटीच्या साधनांचा वापर करण्यात आला आहे. संरक्षण क्षेत्रामधील हा भारताचा मोठा पल्ला मनाला जात असून मागील तीन दिवसातील ही दुसरी यशस्वी चाचणी ठरली आहे.

 

दिनांक २५ आणि २७ मे रोजी ओडिशातील चंडीपूर येथे असलेल्या अवकाश तळावरुन 'आकाश एमके-१एस' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. जमिनीवरून जमिनीवर मारा करण्याची क्षमता असलेले हे क्षेपणास्त्र आपल्या लक्ष्याचा अचूक भेद करु शकते. आकाश क्षेपणास्त्रावरील शस्त्रप्रणालीत कमांड संचालन आणि सक्रिय टर्मिनल संचालन अशी दोन्ही हत्यारे यात देण्यात आली आहेत.

 

डीआरडीओ याआधी शुक्रवारी राजस्थानच्या पोखरणमध्ये विमानातून बॉम्बद्वारे लक्ष्याचा अचूक वेध घेण्याची चाचणी यशस्वीरित्या केली होती. पोखरण इथे सुखोई विमानाच्या मतदीने ५०० किलोग्रॅम बॉम्बने ३० किलोमीटर अंतरावरील लक्ष्यभेद केला होता. यामध्ये पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या साधनांचा वापर करण्यात आला होता.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat