बाबा विश्वनाथांचे दर्शन घेऊन मोदींच्या धन्यवाद रॅलीची सुरुवात

    दिनांक  27-May-2019
काशी : लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर नरेंद्र मोदी आज पहिल्यांदा वाराणसीत दाखल झाले. यावेळी त्यांनी काशीतील विश्वनाथ मंदिरात जाऊन बाबा विश्वनाथ यांचे दर्शन घेतले व पूजा अर्चा केली. यावेळी भाजप अध्यक्ष अमित शाह व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांच्यासोबत होते. त्यांनीही यावेळी पूजा केली.

 

नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी संपुर्ण शहरात सजावट करण्यात आली होती. ज्यावेळी मोदींचे आगमन झाले त्यावेळी त्यांच्यावर गुलाबांच्या फुलांचा वर्षाव करण्यात आला. दरम्यान, पोलीस लाईन ते विश्वनाथ मंदिरादरम्यानचा प्रवास त्यांनी गाडीतून केला. यावेळी मोदींच्या स्वागतासाठी लोकांची मोठी गर्दी होती. मोदींनी गाडीतूनच उपस्थितांचे अभिवादन स्वीकारले.

 

बाबा विश्वनाथाचे दर्शन घेतल्यानंतर मोदी पं. दीनदयाल हस्तकला संकुलात जाणार असून येथील भाजप कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat