‘स्वातंत्र्यवीर दौड’ने दिली शहीद जवानांना आगळीवेगळी आदरांजली

    दिनांक  26-May-2019 

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक समितीचा आगळावेगळा उपक्रम


मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, शिवाजी पार्कची रविवारची सकाळ एका नवस्फूर्तीने भरून गेली होती. स्वातंत्र्यवीर दौड 2019’च्या पहिल्या पवात मुंबईसह नागपूर, पुणे, सातारा, पालघर तसेच महाराष्ट्राच्या विविध भागांतील हजारो स्पर्धक उत्साहाने सहभागी झाले होते. स्पर्धेच्या निमित्ताने स्पर्धक व शिवाजी पार्क या ठिकाणच्या नागरिकांचा उत्साह विशेष होता.

 

पहिल्या मॅरेथॉनचा विजेता होण्याचा मान पटकावला सचिन घरोटे याने. स्पर्धेचे विशेष म्हणजे टीम व्हिजन या अंधांसाठी काम करणार्‍या स्वयंसेवी संस्थेचे दिव्यांग स्पर्धकही सहभागी झाले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, विश्वस्त मंजिरी मराठे, राजेंद्र वराडकर, विकास सबनीस तसेच उषा सोमण, सहायक पोलीस निरीक्षक सूर्यकांत पारटकर, नगरसेवक अरविंद भोसले, स्वप्नील सावरकर, अभिनेते श्रीरंग देशमुख, निवेदिका मालविका मराठे आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. स्पर्धाप्रमुख विज्ञानेश मासावकर तसेच गुरुरचरणसिंग सिद्धू यांनी संपूर्ण स्पर्धेचे यशस्वी नियोजन केले.

 

10 किमी पुरुष 18 ते 27 वर्षीय पुरुष वयोगटात - संदीप ाल, विनोद सामावडवी, प्रवीण यादव, 28 ते 37 वयोगटात अनिल कोरवी, दीपक बंडपे, किसन लाल, 38 ते 47 वयोगटात तानाजी, नितीन, अरुण. 48 ते 57 वयोगटात पांडुरंग, नागोराव भोयर, निहाल, 58 वर्षांवरील वयोगटात केशव मोटे, युजीन कॉड्रस, बजरंग चव्हाण आदी विजयी झाले तर, महिलांमध्ये 18 ते 27 वयोगटात आरती, शिवानी गुप्ता, प्रमिला, 28 ते 37 वयोगटात मिनाज नादुस, बड्रीयन करवचवाला, देवयानी कदम, 37 ते 48 वयोगटात डॉ. इंदु टंडन, शारदा भोयर, माधवी सुब्रमण्यम, 48 ते 57 वयोगटात अरुधन अल्फोन्स, चित्रा नाडकर्णी, अंजना जंगी, 58 वर्षांवरील वयोगटात नीता रामकृष्ण व दक्षा गडाविया या विजयी झाल्या.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat