मोदी सरकारच्या शपथविधी सोहळ्याची तारीख ठरली!

    दिनांक  26-May-2019


 

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजयानंतर नरेंद्र मोदी येत्या ३० मे रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनात सायंकाळी ७ वाजता हा शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची माहिती राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विटरवरून दिली. याचवेळी केंद्रीय मंत्रिमंडळातील इतर मंत्रीदेखील पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत.

 

शनिवारी नरेंद्र मोदी यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) संसदीय दलाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रपतींना भेटून सरकार स्थापनेचा दावा केला होता. त्यानंतर आज सायंकाळी राष्ट्रपती भवनाकडून मोदी सरकारचा शपथविधी सोहळा ३० मे रोजी पार पडणार असल्याचे जाहीर करण्यात आले. दरम्यान, मोदी सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी ३ हजार पाहुण्यांना निमंत्रण पाठवण्यात येणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat