आयएसआयएसचे दहशतावादी केरळमध्ये घुसण्याच्या तयारीत

    दिनांक  26-May-2019
केरळ किनारपट्टीवर सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचे आदेश


तिरुवनंतपुरम : आयएसआयएसचे १५ दहशतावादी केरळमध्ये घुसण्याच्या तयारीत असल्याची धक्कादायक शक्यता राष्ट्रीय तपास यंत्रणेने वर्तवली आहे. हे १५ दहशतवादी श्रीलंकेकडून लक्षद्वीपकडे रवाना झाल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर केरळ किनारपट्टीवर सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले असून मच्छिमारांनाही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

 

श्रीलंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी २३ मे रोजी एक अलर्ट जारी केला आहे. श्रीलंकेतून आलेल्या या अलर्टनंतर केरळ किनारपट्टीवरील सुरक्षा व्यवस्थेत अधिक वाढ करण्यात आली असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. पोलीस दल या हाय अलर्टकडे गांभीर्याने पाहत आहे. किनारपट्टीवरील सुरक्षा आणखीन कडक करण्यात आली असून येणाऱ्या जाणाऱ्यांची कसून चौकशी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat