जातीवरून सिनियरकडून छळ; महिला डॉक्टरची गळफास घेऊन आत्महत्या

26 May 2019 17:32:58


 

तीन महिला डॉक्टरांवर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल, आरोपी फरार


मुंबई : नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी आरोपी महिला डॉक्टरांविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही महिला डॉक्टर आरोपी फरार असून या प्रकरणी पोलिसांनी आता तपासचक्र फिरवले आहे. नायर रुग्णालयात डॉ. पायल तडवी या दुसऱ्या वर्षांत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने रॅगिंगला कंटाळून मुंबईच्या नायर रुग्णालयातील कॉलेज हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी महाविद्यालयातील डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहेर, डॉ. अंकिता खंडेलवाल या तिघींविरोधात अॅट्रॉसिटी, रॅगिंगविरोधी कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे. मात्र, या आरोपी सध्या फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

रॅगिंगला कंटाळून वैद्यकिय पदव्युत्तर शिक्षणाकरिता मुंबईच्या नायर हॉस्पिटलमध्ये शिक्षण घेत असलेल्या डॉ. पायल तडवी या तरुणीने बुधवारी आत्महत्या केली. मयत तरूणी ही आदिवासी तडवी समाजाची होती. तिच्या आत्महत्येस कारणीभूत ठरणाऱ्यांना तात्काळ अटक करावी आणि या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, या मागणीकरिता आदिवासी तडवी समाजाच्या विविध संघटनांच्या वतीने जळगावात आंदोलन केले गेले.

 

या प्रकरणी समाज माध्यमांवरही संताप व्यक्त केला जात आहे. आरोपांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. डॉ.पायल नायर रुग्णालय मंबईत शिक्षत होती. १ मे २०१८ रोजी तिला मागासर्गीय राखीव जागेवर प्रवेश मिळाला होता. यानंतर रुग्णालयात सीनिअर असलेल्या डॉ. हेमा आहूजा, डॉ. भक्ती मेहर, डॉ. अंकिता खंडेलवाल यांनी सतत तिचा छळ केला होता. तिने मागासवर्गीय आरक्षित जागेवर प्रवेश मिळवला म्हणून तिला जातीवाचक टोचून बोलत होते. याबाबत तिने वारंवार वरिष्ठांकडून तक्रार केली होती. मात्र, त्याची दखल न घेतल्याची तक्रार तिच्या आईने घेतली आहे.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0