तेथे कर माझे जुळती, नरेंद्र मोदी संविधानासमोर नतमस्तक

    दिनांक  26-May-2019


 


नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) सर्व नवनिर्वाचित खासदारांची बैठक संसदेतील सेंट्रल हॉलमध्ये पार पडली. यावेळी नरेंद्र मोदी यांनी अशी एक अनपेक्षित गोष्ट केली ज्याने आपल्या सर्वांचा त्यांच्याविषयीचा आदर आणखी वृद्धिंगत होऊ शकतो. एनडीएच्या संसदीय दलाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर मोदी सभागृहातील संविधानासमोर नतमस्तक झाले. उपस्थित सर्वांसाठी मोदींची ही कृती अनपेक्षित होती त्यामुळे सर्वांनी उभे राहून मोदींचे स्वागत केले.

 

भारताच्या इतिहासात कोणताही पंतप्रधान प्रथमच संविधानासमोर नतमस्तक झाला आहे. मोदींच्या या कृतीचे देशभरातून स्वागत केले जात आहे. या कार्यक्रमासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी हे देखील उपस्थित होते. यावेळी नरेंद्र मोदींनी सर्व नवनिर्वाचित खासदारांना मार्गदर्शन केले. व्हीआयपी कल्चर आणि मीडियापासून लांब राहण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat